सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती आणि पुरंदर तालुक्याला जोडणारा नीरा बारामती ४० किलोमीटरचा हा रस्ता या रस्त्याची डागडुजी झाल्याने या रस्त्यावरती अवजड वाहने माल भरून सुसाटपणे जात आहेत या रस्त्यावरती वेगवेगळे उद्योग आहेत यामध्ये दोन साखर कारखाने तसेच दुग्ध उद्योग आहेत.
या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल वाहतूक करण्यासाठी जी अवजड वाहने वापरली जात आहेत त्यांच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरून त्याची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे .
यामुळे वर्दळीच्या ठिकाणी या वाहनांमुळे नागरिकांचा व प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे .त्याचबरोबर बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या एका कंपनीतून मळीची वाहतूक केली जात आहे तसेच साखर कारखान्यांमधून स्पेंट वॉश वाहतूक केली जात आहे ही वाहतूक करत असताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही .
स्पेंट वॉश वाहतूक ट्रकमधून गळती झाल्याने नीरा बारामती रस्ता ठिकठिकाणी काळपट व चिकट झाला असून यामुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे .
त्याचबरोबर ही अवजड वाहने चालवणार्या चालकांना वेगाची मर्यादा नसून माल वाहतूक करत असताना जास्त वेगाने ही वाहने चालविली जातात.मागील काही दिवसांपुर्वी पुरंदर तालुक्यात मध्ये एका ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्या कारणाने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला होता त्याचबरोबर ती सोमेश्वर कारखान्याच्या परिसरामध्ये एक ट्रक पलटी झाला होता ,नीरा बारामती रस्त्यावरती आठ फाट्यानजीक हि एक ऊस वाहतूक करणारे वाहन पलटी झाले होते त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक या वाहनांमधून केली जात असून वाहतूक शाखेकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते