भोर ! हिरडस मावळात आमदार थोपटेंनी विकास कामांच्या पाहणीसह हनुमान मंदिराचे केले भूमिपूजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील हिरडस मावळ खोरे परिसरातील करंजे -दापकेघर-कुडली रस्त्यावरील सांगवी ता. भोर येथे केलेल्या ९९ लक्ष रुपायांचा पूल व अर्थसंकल्प २०२१ अंतर्गत १ कोटी २० लक्ष निधीतून सुरु असलेल्या जोड रस्त्याची पाहणी करून अंगसुळे येथील १० लक्ष रुपयांचे हनुमान मंदिर सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांनी शनिवार दि-१६ केले.
            यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंदा आंबवले, युवा उद्योजक अनिल सावले,राजगड संचालक उत्तम थोपटे, युुवकाध्यक्ष नितीन दामगुडे, उपाध्यक्ष सचिन कंक,विठ्ठल कुडले,सा.कार्यकर्ते संतोष केळकर, सरपंच राणी राऊत, उपसरपंच दशरथ  राऊत,सदस्य गणेश  तावरे, सारिका राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती  राऊत,सरपंच किसन  राऊत, विठ्ठल  राऊत, बाळू कंक,रामचंद्र  राऊत, शिवाजी  कंक,पो.पाटील कृष्णा राऊत,आदींसह ग्रामस्थ, महिला व तरूण बहुसंख्येने उपस्थित होते.
          आमदार थोपटे पुढे बोलताना म्हणाले दुर्गम डोंगरी हिरडस मावळ खोऱ्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असून उर्वरित विकास कामे लवकरच केली जातील.

To Top