सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक व ॲाफीस सुप्रीडेंन्ट सुभाष धुमाळ यांचे वडील प्रल्हाद रामचंद्र धुमाळ यांचे आज मध्यरात्री वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
बारामती सहकारी बॅंकेचे माजी संचालक म्हणुन त्यांनी कामकाज पाहीले होते. त्यांचा सावडणेचा विधी गुरुवार दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गुणवडी चौक मुख्य स्मशानभुमी, बारामती येथे होणार आहे.त्यांचे पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.