सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून चोरट्यांचा वावर असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
सद्या परिसरातील शिवारात रब्बी पिकांची कापणी सुरू आहे. मात्र शिवारात चोरट्यांचा वावर असल्याने नागरिक(शेतकरी) शेतात जाण्यास घाबरत आहेत.नेरे परिसरातील निळकंठ,गोकवडी,धावडी,बाजारवाडी ,पळसोशी येथील शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहावे असे आवाहन नेरे गावचे सरपंच विजय बढे व पत्रकार संतोष म्हस्के यांनी केले आहे.तसेच भोर पोलीस ठाण्यात संबंधित विषय कळवून परिसरात रात्रीची गस्त घालण्याचे सांगितले आहे.