सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अहो ...एमएसईबी चे साहेब..... तुम्हाला लाईट घालवायची आहे तर ती दिवसा घालावा ना...रात्रीची का घालवत आहात.. एक तर दिवसभर अंगाची लाही ..लाही होतेय आणि तुम्ही रात्र झाली की लाईट घालवताय.....
असा सूर नागरिकांनी सुरू केला आहे. याबाबत अनेकांनी सोमेश्वर रिपोर्टर शी संपर्क साधून महावितरण च्या कारभाराविषयी पाढा वाचला आहे.
गेले तीन दिवसांपासून पाऱ्याने उच्चाक गाठला असून लोकांना उकाड्याने नकोसे झाले आहे. त्यातच महावितरण गेले तीन दिवसांपासून रात्रीची लाईट घालवत आहे. त्यामुळे लोकांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. रात्रीची लाईट घालवण्यापेक्षा दिवसा लाईट घालवायला तुमच्या हाताला शॉक लागला आहे का? आशा प्रतिक्रिया नागरिकांच्यातुन येयला लागल्या आहेत.