पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune Reporter



पुणे प्रतिनिधी   

पुणे शहरपिंपरी-चिंचवड महानगरासह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

 

            पुणे शहरातील हडपसर येथे कै. महादेवराव (आप्पासाहेब) बडदे उद्यान लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपेवैशाली बनकरबापूसाहेब बडदे आदी उपस्थित होते.

 

            उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  राज्याच्या सर्वांगीण विकासासोबत  मानवी जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावीआणि त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नव करण्यात येत आहेत. त्यासाठी  राज्यात दळणवळणला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

 

            कोरोना काळातही राज्य शासनाने विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी या काळातही विशेष प्रयत्न करण्यात आले. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने करावेअसे आवाहन त्यांनी केले.

 

            आमदार चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले

To Top