सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर - प्रतिनिधी
भोर शहराशेजारील भोलावडे येथे शुक्रवार दि- २७ सायंकाळी पाचच्या दरम्यान अचानक कालिदास आवाळे यांच्या घराला आग लागल्याने शेजारील सुभाष आवाळे,सुनील आवाळे,बबन आवाळे,विजय आवाळे यांच्याही घरे आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली असून आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी भोर नगरपालिका अग्निशमन दल ,सह्याद्री रेस्क्यू टीम तसेच भोर पत्रकार संघाचे कार्यकर्ते,तहसीलदार सचिन पाटील,जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे तसेच भोलावडे गावचे ग्रामस्थ तरुण मंडळ त्वरित पोहचून आग विझविण्याचा प्रयत्न केला.आग मोठ्या प्रमाणावर असल्याने आग विझविण्याचे काम शर्तिने सुरू आहेत.