बारामती-जेजुरी गुळगुळीत रस्ता ठरतोय प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा : दोन दिवसात पाच जणांचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी
जेजुरी - बारामती या जिल्हा मार्ग क्र ६५  चे अंतर  ५० किमी आहे. या मार्गाचे  रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे . मात्र नव्याने झालेल्या या रस्त्यामुळे वाहन चालकांच्या गाडीला वेगाचा लगाम  नसल्याने हा रस्ता म्रुत्युचा सापळा बनला आहे. गेल्या दोन दिवसात पाच व्यक्तींचा म्रुत्यु तर  चार गंभीर जखमी आहेत .
         यापुर्वी जेजुरी वरुन बारामती कडे जाणारा रस्ता जागोजागी  खड्डे , उखडलेले डांबर  व अरुंद  होता . यामुळे रस्त्याचे  रुंदीकरण व डांबरीकरणाचे गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेले काम पुर्ण झाले आहे.  भरधाव वेगाने अवघ्या ४० मिनिटांच्या कालावधीतच बारामतीवरुन जेजुरीपर्यंत पोहचता येत आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  गुणवत्तापूर्वक रस्ता  बांधणी कामाकडे  असणारे लक्ष व यामुळे  ठेकेदाराने गुणवत्तापूर्वक केलेले काम यामुळे या रस्त्यावरील खाजगी व  मालवाहतूक  वाढत चालली आहे .तसेच  रस्त्याच्या बाजुला नव्याने छोटे मोठे असंख्य  उद्योग धंदे निर्माण झाले आहेत . 
        मात्र हा रस्ता म्रुत्युच सापळा  बनत चालला आहे . रस्त्याच्या बाजूला वळण , उतार , चढ , शाळा , गाव , चौक आदी  दिशादर्शक फलक नसल्याने आठवड्याला दोन - तीन अपघात घडत आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्वस्त कोत आहेत.  वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत .  वाहनांना वेगाचा लगाम नसल्याने गेल्या  दोन  दिवसांत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहेत . तर गेल्या सात दिवसांत झालेल्या अपघातात  तीन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष पुरवुन जागोजागी गतीरोधक व दिशा दर्शक फलक लावण्याची मागणी पश्चिम भागातील सरपंच व ग्रामस्थ यांकडून होत आहे .
------------------------
अत्यंत वेगाने भरधाव गाड्यांमुळे पिसर्वे येथील दांपत्य , मेडद येथील एका जेष्ठ नागरीकाचा ,तर मोरगाव येथील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे . तर  याच रस्त्यावर झालेल्या अपघातात लोणी भापकर व मोरगाव येथील चार व्यक्ती गंभीर जखमी आहेत
To Top