सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथे शामकाका काकडे यांच्या बंगल्याजवळ नीरा बारामती रस्त्यावर एका महिंद्रा xuv या चारचाकी गाडीचा अपघात झाला आहे.
यामध्ये संतोष कदम यांचा या अपघातात मृत्यू झाला असून जखमी प्रवीण कदम व भारतीय सैन्यदलातील अभिमन्यू कदम यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. सर्वजण पिंपोडे येथीलच रहिवासी होते. त्यांच्या अन्य एका सैन्यदलातील मित्राला सोडवण्यासाठी ते दौड ला गेले होते. माघारी येताना निंबुत येथील लक्ष्मीनगर ओढ्यानजीक हा अपघात झाला.
ही गाडी लोणंद ता खंडाळा येथील असल्याचे प्राथमिक माहितीत समजत आहे. हा अपघात पहाटे ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
-------------