सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात उस तोड कामगारांची कमतरता भासत असली तरी राजगड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या उसाची ठीक -ठिकाणी मशीनद्वारे ऊस तोडणी करण्यात येणार आहे.या मशिनद्वारे भोर-वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उस पूर्णतः तोडून गाळप केले जाईल.तर उस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात उसाचे टीपरुही शिल्लक ठेवणार नाही असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील मौजे सारोळा येथे शनिवार दि.२८ शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन ऊस तोडणी मशीनद्वारे ऊसतोडणीचा शुभारंभ केला त्यावेळी ते बोलत होते.ऊसतोड कामगार संख्या कमी असल्याने प्रत्यक्ष मशीनद्वारे ऊसतोडणी करण्यात येत असून भोर व वेल्हा तालुक्यात अनेक ठिकाणी मशीन सुरू आहेत. संपूर्ण ऊस तोडून गाळप केल्याशिवाय कारखान्याचे गाळप बंद करणार नसल्याचे आमदार थोपटे म्हणाले.यावेळी किसन थोपटे व उस उत्पादक शेतकरी हजर होते.