सुपे परगणा ! बाबुर्डी-शेरेवाडीत ५५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सुपे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या ५५ लाख रूपये किंमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते पार पडले. 
       यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष राहुल वाबळे, बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अँड. रविन्द्र माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर कौले, दादा जराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यामध्ये शेरेवाडी येथील मारूती मंदिर सभामंडपासाठी २० लाख रूपये,बाबुर्डी येथील भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण १० लाख रुपये, शेखर खोमणे घर ते भैरवनाथ मंदिर रस्ता डांबरीकरण १५ लाख रुपये तसेच गणपती मंदिर चौक ते जयराम बाराते घर क्राॅक्रिट रस्ता १० लाख रूपये याप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे. या सर्व कामांचे आज उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब लडकत, माजी सरपंच अंकुश लडकत, गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच अँड दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्या मंगल लव्हे, मनिषा बाचकर, रुपाली लडकत, सदस्य दत्तात्रय ढोपरे, हौसराव पोमणे, साहेबराव पोमणे, उत्तम लडकत, बबन लडकत, अतुल लडकत, सचिन लकडत, लक्ष्मण पोमणे, गोरख खोमणे, राजकुमार लव्हे, संतोष पोमणे, गोविंद बाचकर, विशाल लडकत, सचिन बाराते तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top