वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेकर मळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमासाठी आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. 'माझी शाळा' एक दिवस शाळेसाठी या संकल्पने तून शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुभाष राऊत व पत्रकार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला गेला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे Api सोमनाथ लांडे यांनी उपस्थिती दाखवली. कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते राजेश्वरराजे राजे निंबाळकर व मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी सोमनाथ लांडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून सांगितले. वृक्षारोपण कार्यक्रम व माझी शाळा एक दिवसासाठी या संकल्पनेचे अभिनंदन केले. या शाळेतील वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अनेक ग्रामस्थांनी मन मोकळ्या मनाने मदत मोलाचे सहकार्य लाभले. प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा यासाठी 125 रोपे आणण्यात आली. आणि वृक्षारोपण करण्यात आले यावेळी लालासो दरेकर,यशवंत देवकर,सुधीर जाधव,आकाश बालगुडे, सचिन गायकवाड,वैभव दुर्गाडे,नितीन राऊत, गोटू राऊत, अमोल बालगुडे, किशोर दरेकर,जालिंदर दरेकर, विकी दरेकर, अनिल जाधव,विजय दरेकर, संकेत दरेकर,प्रतीक बनकर व शिक्षिका छाया नलवडे व शिक्षिका वर्ग उपस्थित होते.