भोर ! सहकार चळवळ वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे योगदान : रुपाली चाकणकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 सहकाराच्या चळवळीची राज्यात मोठी ताकद असून ही चळवळ वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. सहकाराच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा पाया मजबूत झाला आहे.असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.
      महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भोर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भोर येथे शुक्रवार दि.२२ आयोजित तालुक्यातील ७३ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी चाकनकर बोलत होत्या.
      यावेळी राज्य युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत वरपे, जि.प.चे मा.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, माजी आदर्श जि.प.सदस्य चंद्रकांत बाठे,माजी नगसेवक यशवंत डाळ,जिल्हा बँकेचे माजी संचालक भालचंद्र जगताप ,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भोर शहराध्यक्ष नितिन धारणे,जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस रविंद्र बांदल, युकाध्यक्ष गणेश खुटवड, वंदना धुमाळ,विलास वरे, मनोज खोपडे, महिलाध्यक्षा यादव, प्रविण  जगदाळे, पर्वतीनाना कुमकर, दिलीप देशपांडे, युवराज जेधे, आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमात रणजीत शिवतरे, , भालचंद्र जगताप, रविंद्र बांदल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
    चाकणकर बोलताना म्हणाल्या संघटनेच्या माध्यमातून केलेले काम समाजसेवा असते सत्ता आली काय आणि नाही काय पक्षाच्या संघटनेचा कार्यकर्ता हा निष्ठावंत असतो.

To Top