भोर ! संतोष म्हस्के ! हिरडस-मावळातील कोंढरीत रानडुक्कर,सांबराचा धुडगूस : १५ ते २० शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
     भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यातील कोंढरी ता.भोर येथील जिजाबा गणपत पारठे यांच्यासह पंधरा ते २० शेतकऱ्यांच्या भात शेतीतील रोपांचे रानडुक्कर व सांबराने थैमान घालीत भात रोपांच्या तरव्यात नाचून तसेच अर्धवट अवस्थेत खाऊन टाकल्याने  अतोनात नुकसान केले आहे.
     हिरडस मावळ खोऱ्यात पाऊसाच्या प्रतीक्षेत धूळ वाफेवर भातरोप पेरण्यात आले होते.भातरोप पेरल्यानंतर काही दिवसांनी पावसाने सुरुवात केल्याने भात रोप जोमात आले होते.मात्र सतत जोरदार बरसणाऱ्या पावसात रोपांची उंची वाढली गेली नाही.त्यातच जंगली प्राणी रानडुक्कर व सांबराणे उगवून आलेल्या भात रोपांची नाचून तसेच खाऊन टाकल्याने अतोनात नासधुस केली आहे. वनविभागाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

वन्य प्राण्यांना शेतकऱ्यांनी इजा करू नये
    हिरडस मावळ खोऱ्यातील डोंगराशेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताततील पिकांमध्ये शिरून वन्यप्राणी नासधुस करीत असतील तर त्यांना हाकलून लावा मात्र इजा करू नका.ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे.त्यांनी वन विभागाकडे नुकसानीचे अर्ज करावेत.त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळवून देवू असे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी सांगितले.
To Top