अभिष्टचिंतन....! सदैव बहरणारा आम्र वृक्ष... अजितदादा निगडे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------                                            नदीने कसं वाहव हे ती ठरवते आपण सांगून ती वाहत नाही.कारण तिचा  तो अंगभूत गुण असतो.ती कोणाचे ही ऐकत नाही फक्त सभोवती असणाऱ्या सजीव निर्जीवांचे जीवन सुजलाम सुफलाम करणे एवढच तिला माहित..कवी यशवंतांनी सरिता करिते का कधी खंत या कवितेत नदी सर्वांवर परोपकार करीत   असते.तिच्याकडे भेदभाव मुळी नसतो.सर्वांना आपल्यात सामावून घेणे एवढेच तिला माहित असते.तात्पर्य समर्पित भावना तिच्या ठायी असते.तसंच कांही तरी समाजातील काही ठराविक व्यक्तींमत्वांच्या बाबतीत दिसून येते मा.अजितदादा विजयसिंह निगडे (देशमुख) हे त्यापैकी एक व्यक्तीमत्व....
                आज सहा जुलै हा त्यांचा वाढदिवस..त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.अशी माणसं समाजात वेगळं व्यक्तिमत्त्व कसं निर्माण करतात.माझ्या मते अंगभूत गुण व आईवडिलांचे संस्कार.कै.बापू मला जवळून अनुभवायला मिळाले आणि ऐकायलाही मिळाले.कै.बापूंच्या बालपणाविषयी मुर्टीचे माझे मेव्हणे कै.जगन्नाथ  मोरे गुरुजी हे त्यांचे बालमित्र.सातवीपर्यत एकत्र गुळुंच्याहून निरेला जायचे.पुढे कै.बापू शिकायला पुण्याला गेले व कै.मोरे हे प्राथमिक शिक्षक झाले.याची मैत्री स्काॅलरपणामुळे होती.पुढे 1957 मध्ये बीएससी अॅग्री झाले.नंतर ते एकमेकांना भेटत असायचे.गांवच्या राजकारणातील सरपंच पदापासून पुरंधर पंचायत समितीचे सभापती झाले.राजकीय करकिर्द निष्कलंक ठेवली.तत्वनिष्ठ राजकारण हा त्यांचा पिंड होता.आतासारखे उबग आलेले राजकारण नव्हते.त्याकाळी कै.सर्जेराव निगडे तथा मास्तरदादा,कै.रामराव निगडे हे त्यांचे मार्गदर्शक व राजकीय गुरु म्हणा.. तालुका पातळीवर एका विचारांची माणसं एकत्र येतात तसे आदरणीय कै.उरसळ आण्णा व कै.बापू एकत्र आले.सामाजिक आणि राजकीय चळवळ भक्कम झाली.त्याकाळी ग्रामगौरव ही योजना या द्वयींनी गावोगावी राबविली.आज त्या विचांराना मधुर फळे आलेली आपण अनुभवत आहोत.कै.बापूंचे शिफारस पत्र फर्डा इंग्रजीत असायचे.ती त्यांच्या विद्वतेची साक्ष होती एकूण कै.बापू सुसंस्कृत,शांत,सयंमी, मितभाषी,कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व होते मग त्यांचे त्यांचे संस्कार आदरणीय अजितदादांचे वर झाले नाही तर नवलच.पुढे दादांनी गुळुंचे गावाच्या विकासात भर घातली.गांवाचे सरपंच पद भूषवून पुरंदर पंचायत समितीचे सभापती पद ही भूषविले.त्या  माध्यमातून तालुक्यातील विकासात भर टाकली.शिक्षणांने माणूस घडतो या डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पूजनीय बापूजी साळुंखे,कै.बाबूराव घोलप,कै.उरसळ आण्णा,व कै.बापू यांच्या विचारांने प्रेरित होऊन पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष म्हणून आदरणीय सतिशभाऊ उरसळ व कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादा निगडे यांनी कै.उरसळ आण्णा व कै.विजयसिंह निगडे बापू यांच्या विचारांचा वारसा घेऊन यशस्वी वाटचाल करीत आहेत तसं पाहिलं तर शिक्षण संस्था चालवण सोपे नाही.कारण सध्याच्या राजकारण्याची उदासीनता व खाजगीकरणाचा पुरस्कार हे आज तरी शिक्षण क्षेत्राला मारक आहे.सध्याच्या राजकारण्यांनी शिक्षण क्षेत्रात कारणाशिवाय जीव घेणी स्पर्धा निर्माण केली आहे.आशा वातावरणात सत्तेत नसताना मी तरी म्हणेन हे तुफानातील दिवे आहेत.अंगभूत व स्वतेजाने तळपत आहेत.हे सामान्यांसाठी भूषणावह आहेत कारण  आज खाजगीकरणात सामांन्य पालक भरमसाठ फी भरून शिकवू शकत नाही.मी गरीब कुटुंबातील या पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळुंचे येथील जून1970ते मार्च 1974चा माजी विद्यार्थी.या हायस्कूलची एस एस सी ची समर्पित हुशार व  त्यागी मुख्याध्यापक कै.अमिनगड सरांची पहिली बॅच.असली देव माणसं कशी शोधून आणली होती याचं आज आश्चर्य वाटते.या शिक्षण संस्थेने अनेकांना  भक्कम पायावर उभे करून त्यांचे संसार सोन्याचे केले.खेडेगांवातील आपले विद्यार्थी उच्च पदावर गेले.ही काल्पनिकता नाही तर वास्तव आहे.गुळुंचे येथील आम्ही बरोबर शिकणारे कै.बापू रावजी गायकवाड (माझे चुलते) यांचा मुलगा शशीकांत हा महाराष्ट्र राज्यांच्या विधानसभा व विधानपरिषद या सभागृहाचा आवर सचिव झाला.एकही शब्द मराठी न बोलता फडाफडा इंग्रजी बोलतो    हे कै.अमिनगडसरांच्या इंग्रजी अध्यापनाचे फलित.आदरणीय दादा आज आपण या शिक्षण रुपी वृक्षाला निकोप वाढीसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहात व गांवाच्या,तालुक्याच्या विकासासाठी आपले योगदान निर्मळ झऱ्यासारखे अखंडपणे चालू असते.आपल्या निःस्वार्थी कार्याबद्दल समाज आपला सदैव ऋणी राहील यात शंका नाही.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या गायकवाड कुटुंबियांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.. आपणास व आपल्या कुटुंबाला श्री.जोतिर्लिंग महाराज आरोग्य पूर्ण दिर्घायुष्य देवो ही प्रार्थना.कृपया जसं वाटलं तसा व्यक्त झालो.मात्र हे कृतज्ञतेचे शब्द आहेत..हे निश्चित

 श्री.एस.एस.तथा श्री.संभाजी सिताराम गायकवाड मो.नं.7768098296
 
To Top