सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील भाटघर तसेच निरा-देवघर धरण पट्ट्यातील धरण क्षेत्रात गेले तीन दिवसांपासूनच पावसाची रिमझिम सुरू असून डोंगर पट्ट्यात जोरदार पावसाची सुरुवात झालेली असल्याने भोरकरांची पावसाची प्रतीक्षा संपलेली आहे.
तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाबरोबरच अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाखळीत वाढ होत चाललेली आहे.तर शेतात पेरणी केलेल्या भात तसेच कडधान्य रोपांना या पावसाचा वाढीसाठी चांगलाच फायदा होत आहे.सद्या भाटघर ८ टक्के(२ टीएमसी)तर नीरा -देवघर धरणात ५ टक्के(०.७ टी एमसी) पाणीसाठा उरलेला आहे.पुढील काळात पाउस याच प्रमाणात सुरू राहिला तर पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार असल्याचे चित्र आहे.सद्या तालुक्यात पुढील मंडल परिसरात भोर-११, निगुडघर-११, संगमनेर-२०, नसरापूर-५, किकवी-६, वेळू-५, भोलावडे -८ तर आंबवडे १० मिलिमीटर पाउस झाला आहे.तसेच पावसाची रिमझिम सुरू असून जोर कायम आहे.