भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! भोर - आंबाडे रस्त्यावर खानापुर येथे झाड कोसळले : वाहतूक ठप्प

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
   भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील भोर -आंबाडे महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गावरील खानापूर येथील पुलाजवळील भले मोठे बाभळीचे झाड रस्त्यावर जोरदार पावसात कोसळल्याने दोन्हीकडील वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक बंदमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शाळेच्या मुलांचे, शिक्षक ,दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे तसेच भोरला दैनंदिन हाल मोठे झाले आहेत.
      तालुक्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.या पावसामुळे रस्त्याशेजारील झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार सुरू आहेत.मागील दोन दिवसांपूर्वी खानापूर जवळ एक वाळलेले झाड रस्त्यावर पहाटेच्या वेळी कोसळले होते .हे झाड अंधारात वाहन चालकांना दिसले नसल्याने अनेक जण जखमी झाले होते. तालुक्यातील भोर-कापूरहोळ ,भोर -अंबवडे, भोर - पांगरी तसेच भोर - मळे ,भोर - शिरवळ या महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यान शेजारील वाळलेली मोठ - मोठी झाडे तसेच रस्त्यावर आलेल्या मोठमोठ्या झाडाच्या फांद्या लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूला कराव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. अन्यथा मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले.
     खानापूर जवळील रस्त्यावर बाभळीचे झाड कोसळल्याची माहिती वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले आहे.रस्त्यावरील झाड बाजूला करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून त्वरित झाड बाजूला केले जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.
To Top