सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा गुळुंचे मोरगाव झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून अवघ्या एक महिन्यातच रस्त्याची चाळण झाली असून शासनाच्या करोडो रुपयांना चुना लावणाऱ्या ठेकेदाराने आता रात्रीच्या अंधारात नव्या कोऱ्या रस्त्यावर ठिगळ लावण्याच काम सुरू केलं आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सदस्य कांचन निगडे यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निवेदन पाठवले आहे.
याबाबत कांचन निगडे यांनी मा. अजित पवार यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली कित्येक वर्षा पासून माझं गाव रस्त्याच्या प्रतीक्षेत होतं, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरा ते मोरगाव चौफुला पर्यंत रोडवर प्रचंड मोठा निधी टाकला हे सर्व ज्ञात होतं, रस्त्याच्या कडेची गावं समाधानी झाली, अनेक दिवस मातीचा धुरळा सोसला, मोठं मोठं खड्डे जीवघेणे होते ,अनेकांनी प्राण ही गमावलेत त्यामुळे नवीन रस्ता होत आहे यामुळे गावकरी आनंदी होती पण तो आंनद क्षणभंगुर ठरला ज्यांनी काम घेतलं त्यांनी इस्टिमेट नुसार चालायला अपेक्षित असताना केवळ भरीव खडी , दगडी, गोटे,आदी न टाकता मुरूम मिश्रीत मटेरियल वापरलं त्याचं एका पावसातच माती झालं कुठं कुठं तर मातीच वापरत होती दगडे वस्ती नजीक हा प्रकार घडलेला तिथं काही संघटनांनी विरोध केला त्यामुळे तिथं माती टाकनं थांबलं .
त्यामुळं एकाच पावसात त्याच पीठ झालं माती झाली पर्यायी रस्ता खचून साक्षात ठेकेदाराने शासनाच्या पैस्याला चुना लावला , आता दुरुस्ती च्या नावाखाली एकाच महिन्याच्या नव्या कोऱ्या रस्त्याला ठिगळं लावायचा धंदा सुरू आहे जे "रात्रीस खेळ चाले ..."
निरा ते मोरगाव हद्दीत या निकृष्ठ कामामुळे चौधरवाडी हद्दीत एका दुचाकीस्वाराने आपला प्राण गमावला आहे.त्यामुळे या ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. त्यांचे कडून पुन्हा नव्यानं इस्टीमेट नुसार काम करून घेण्याचे आदेश देत ज्या अभियंता पातळीवर या ठेकेदाराची बिले काढली त्यांच्या चौकशीचे आदेश देऊन त्यांना या कामात हिरवा कँधील दिलाच कसा याची विचारणा व्हावी ही विनंती .