सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
मंगळवार दि . ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत सामुदायिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम त.ल.जोशी विद्यालय,वाई येथे डॉ.अशोक जोशी सभागृहामध्ये संपन्न झाला.
प्रांताधिकारी श्री जाधव, डी वाय एस पी सौ.खराडे यांच्यासह शिक्षण,नगर परिषद व महसूल विभागतील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हे विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी विद्यालयाच्या संगीत विभागाने बँड स्कोडच्या तालावर प्रमुख मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.
सर्व विद्यार्थी व उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामुदायिक गायन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयाची प्रार्थना सुमधुर आवाजात सादर केली.
सर्व अतिथींचे स्वागत मुख्याध्यापक रवींद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास वाईचे प्रांताधिकारी मा.जाधव , तहसीलदार मा.भोसले , तालुका विकास अधिकारी श्री.घोलप , मा.गटशिक्षणाधिकारी. सुधीर महामुनी , प्रशासनाधिकारी श्रीनिवास वाळेकर , न.पा.प्रशासकीय अधिकारी श्री.गोसावी , केंद्र समन्वयक विकास जाधव , पी. आय. भरणे , ए. पी.आय तेलतुंबडे , तसेच पी एस आय.श्री पवार , श्री. वाळुंज, सौ सोमदे तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, विद्यार्थ्यांचे पालक व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भोज यांनी तर आभार प्रदर्शन प्रताप यादव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.