भोर ! येणाऱ्या ऊस गाळप हंगामासाठी 'राजगड' सज्ज ! मिलरोलरचे पूजन संपन्न

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
अनंतनगर निगडे ता. भोर येथील राजगड सहकारी साखर कारखाना सन २०२२-२३ च्या गळीत हंगामाचे मिलरोलरचे पूजन माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि.८ कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके व सर्व संचालक मंडळाचे हस्ते करण्यात आला.यावेळी ३.२५ लाख टन उसाचे गाळप करणार असल्याचे उपाध्यक्ष सुके यांनी सांगितले.
      कारखान्याचे आगामी गाळप हंगामासाठी एकूण ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नोंदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.३ हजार २३९ हेक्टर क्षेत्राची पूर्ण नोंद झाली असून उर्वरित क्षेत्र नोंदीचे काम सुरू आहे.तोडणी व वाहतुकीसाठी १०० ट्रॅक्टर ,५० ट्रक सह ५ ते ६ हार्वेस्टरचे करार पूर्ण झालेले आहेत. बहुतांश वाहनांना ऍडव्हान्स वाटप केला आहे. यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार असून गटवार शेतकरी मेळावे घेण्याचे नियोजन केले आहे. त्यातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून ऊस लागवड व एकरी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. कारखान्यातील मशनरीच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे असेही सुके यांनी सांगितले. यावेळी माजी उपाध्यक्ष विकास कोंडे ,दिनकर धरपाळे, प्रताप शिळीमकर ,शिवाजी कोंडे ,सुधीर खोपडे, दत्तात्रय चव्हाण ,अशोक शेलार, सुरेखा निगडे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील महिंद आदींसह खाते प्रमुख व शेतकरी उपस्थित होते.

To Top