पालघर ! टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पालघर : प्रतिनिधी
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येत असतांना चोरोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघाच झाला आहे. याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून याबाबतची अधिकृत माहिती पालघर पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.
        सायरस मिस्त्री हे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येत होते. ते पालघरमधील डहाणू तालूक्यातील चारोटी या गावातील चारोटी नाक्यावर त्यांची चारचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. त्यांची 2019 साली सायरस मिस्त्री यांनी टाचा समूहाच्या प्रमुखपाची सुत्रे सांभाळली होती. मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुंटुंबात झाला होता. पल्लोनजी मिस्त्रींचे ते धाकटे सुपूत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांच शिक्षण झाल तर लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण झालं केले होते.

2006 साली मिस्त्री टाटा समुहाचे सदस्य बनले होते. तर 2013 साली वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. मात्र, 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना टाटाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.
To Top