सोने खरेदी करण्याचा विचार करतायं....! तर हीच वेळ फायदेशीर....! दसरा दिवाळी आणि लग्नसराई मध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
नुकतीच अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँकेची मिटिंग होऊन 0:75 % व्याज दरामध्ये वाढ केल्याने आणि व्याजदर वाढीचे सुतोवाच अगोदर च केल्याने जवळपास 1500  रु. तोळ्यामागे सोन्याचे भाव अचानक कमी झाले त्यामुळे सणासुदी साठी आणि लग्नसराई साठी सोने खरेदीसाठी किंवा बुकिंग साठी हिच योग्य वेळ असल्याचे इंडिया बुलिअन & ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक आणि बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.
           आगामी काळात आंतरराष्ट्रीय दागिन्यांचे विविध राज्यात होणारी प्रदर्शने, प्रदर्शनासाठी होणारी सोन्याची मागणी,दसरा  दिवाळी, लग्नसराई,यामुळे सोन्याचा भाव 55 हजार रु. तोळ्यापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता आळंदीकर यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना वर्तवली आहे. चांदीने देखील मागील 15 दिवसात निचांकी दर गाठून 52200 रु. किलो पर्यंत खाली आली होती त्यामध्ये वाढ होऊन 58 हजार रु. किलो पर्यंत पुन्हा भाववाढ़ झाली. चांदी देखील 65 हजाराचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. फेडरलं रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की सोन्याचे दर कमी होतात, आणि व्याजदर कमी केले की सोन्याचे दर वाढतात असे आज पर्यंत चे समीकरण आहे, परंतु असे असले तरी मौल्यवान धातुंची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी, भू - राजकीय तणाव, व्यापारातील अडथळे, महागाई, डॉलर निर्देशांक, चलनातील चढ उतार इत्यादी घटकांवर अवलंबून असते असे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
         ग्राहकांसाठी सोने - चांदीच्या काही दुकानातून एक योजना असते ती म्हणजे, ठराविक रक्कम देऊन आज च्या बाजारभावप्रमाणे तुम्ही सोने बुक करू शकता, भविष्यात सोन्याचे भाव वाढले तरी सोने बुक केल्याने ग्राहकांचे नुकसान होतं नाही आणि चुकून बाजारभाव कमी च झाले तर आपण बुक केलेला भाव आणि कमी झालेला भाव यातील फरक प्रत्यक्ष खरेदी करताना दुकानदाराकडून परत मिळतो, म्हणजे भाव वाढला किंवा कमी झाला तरी ग्राहक फायद्यात राहतो.  या योजने संबंधी विश्वासू दुकानात माहिती घेऊन बुकिंग करण्यासाठी सध्याचा काळ तरी योग्य आहे.
              शुक्रवारी संध्याकाळी मार्केट बंद होतं असताना, 24 कॅरेट सोन्याचा भाव 49900 रु. इतका होता तर 22 कॅरेट सोन्याच्या दागिना्यांसाठी 46700 इतका बाजार भाव होता,असे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
To Top