बारामती ! मनोहर तावरे ! गड्यांनो आता तयारीला लागाच…..! गाव पुढाऱ्यांची उत्साही तरुणांना साद....! गावकी आणि भावकीची प्रतिष्ठा लागणार पणाला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : मनोहर तावरे
बारामतीच्या ग्रामीण भागात सध्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात आल्याने कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी स्थिती आहे. ग्रामपंचायत वर सत्ता स्थापनेसाठी गावागावातील राजकीय आखाडे चर्चेने रंगत आहेत. निवडणूक मोर्चा बांधणीसाठी गावातील जाणत्या पुढाऱ्यांनी तरुणांना साद घालत निवडणुकीच्या तयारीला लागा अशी भावनिक साद घातली आहे.
          बारामतीच्या अनेक गावांतील येणारी ग्रामपंचायत निवडणूक कशी असेल यावरून राजकीय तर्क वितर्क सुरू आहेत. ग्रामपंचायत सत्ताधारी हे आम्हीच कसे ? चांगले हे पटवून देण्यासाठी प्रयत्न करतात. याचबरोबर सर्वाधिक विकास आम्हीच केला हे सांगायला विसरत नाही. यामुळे आगामी निवडणुकीत जनतेने आम्हालाच परत संधी द्यावी अशी अपेक्षा आहे.
          याच स्थितीची दुसरी बाजू समजावून घेताना. गावा-गावात ग्रामपंचायत विद्यमान विरोधक यांनी निवडणुकीची रणनीती तयार केलेली आहे. यावर्षी निवडणुकीत ‘सरपंच’ पद निवड थेट जनतेतून आहे. यामुळे गावकी आणि भावकीला मोठी प्रतिष्ठा मिळणार आहे. संभाव्य उमेदवार कोण ? असतील त्यांना मिळणारी मतांची संख्या जमवण्याची गणित सुरू झाली आहेत.
      बारामती तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत सत्ता राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नेतृत्व मानणाऱ्या आहेत. हे वास्तव असले तरी ? प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवर एकच पक्षाचे दोन सत्ता गट पाहायला मिळतात. यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लक्षवेधी ठरतील.
  सध्या येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत नेतृत्व करण्यासाठी अनेक ठिकाणी तरुण वर्गाची अपेक्षा वाढली आहे. सोशल मीडियाचा वाढत असलेला वापर आर्थिक सुबत्ता हे एक प्रमुख कारण ठरले आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका सामान्य मतदारांना कुतूहलाचा विषय ठरणार आहेत.
To Top