सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
पुसेगाव हिंद केसरी मैदानात महाराष्ट्र श्री सेवा गिरी महाराज अमृतमहोत्सवा निमित्त पुसेगाव ता. खटाव जि. सातारा मध्ये सुरु असलेल्या यात्रे मध्ये काल दि.२०-१२-२०२२ रोजी बैलगाडी शर्यती पार पडल्या या स्पर्धेमध्ये सुमारे ५५० बैल जोड्या ने सहभाग घेतला होता.
दोन दिवस चालल्या या स्पर्धे मध्ये दोन्ही हि दिवस करंजेपुल च्या बाजी या बैलाच निर्विवाद वर्चव राहीले. सलग दुसऱ्या वर्षी याच मैदानात महाराष्ट्रातील नामवंत बैलांचा पराभव करत फायनल गाठुन सर्वानाच धक्का दिला. बाजी बरोबर उत्तम शेठ गवळी दहीवली बदलापूर यांचा सप्त हिंद केसरी भारत हि जोडी मैदानात सुपर फास्ट धावली.
विजयी होऊन घरी आल्या नंतर हिंद केसरी बाजी ची करंजेपुल ग्रामस्थांनी संपूर्ण गावातुन मिरवणूक काढली. नुकत्याच लम्पि सारख्या भयानक आजारातुन बरा होऊन मिळवलेल्या या यशा च संपूर्ण महाराष्ट्रातुन कोतुक होत आहे.
बाजी हा मोनीश म्हात्रे आणि पक्ष्या ग्रुप करंजेपुल यांच्या मालकीचा असून तो संपूर्ण महाराष्ट्र भर त्याच्या गावाच्या म्हणजे करंजेपुल च्या नावानेच मैदानात धावतो.
ग्रामस्थांनी काढलेल्या या मिरवणुकीत सोमेश्वर साखर कारखान्यांचे संचालक ऋषी आबा गायकवाड , गावाचे सरपंच वैभव गायकवाड प्रसिद्ध गाडा मालक दादा गायकवाड , सागर भैय्या गायकवाड, अरुण दादा साबळे, प्रशांत भैय्या रिठे यांच्या सह सर्व युवक सहकारी उपस्थिति होते.