सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपूल ग्रामपंचायतीअंतर्गत शेंडकरवाडी (ता. बारामती) येथे नीरा डावा कालव्यावर बांधत असलेल्या नव्या पुलाची उंची खूप जास्त होत असल्याने ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर याची दखल घेत कामाच्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही या चर्चेत सहभागी होत तोडगा काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
नीरा डावा कालव्यावरील शेंडकरवाडी येथील जुना पूल पाडण्यात आला. त्या जागी २ कोटी २३ लाख रूपये खर्चाचा नवा पूल गर्डेल पध्दतीने बांधला जात आहे. आताचा पूल कालव्याच्या भरावापासून दोन मीटरपेक्षा अधिक उंच झाला आहे. यामुळे हा पूल वाहतूकयोग्य राहणार नाही. विशेषतः शेतीमालाची व उसाची वाहतूक ठप्प होणार आहे. यामुळे कोट्यवधी खर्चूनही पाण्यात जाण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पूल उंच होतोय हे स्पष्ट झाल्यावर सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रूपचंद शेंडकर, करंजे सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास शेंडकर आदींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कंत्राटदारास काम पूर्णपणे बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता. प्रशासकीय पातळीवरून तोडगा निघाला तरच पुलाचे काम सुरू करू देण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते.
या आक्रमक भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एम. मुखेकर, शाखा अभियंता उदय नांदखिले, कंत्राटदार राऊत यांनी मंगळवारी भेट घेतली. याप्रसंगी ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी पुलाची उंची जास्त झाल्याचे मान्य केले. पाटबंधारे खात्याने परवानगी देताना घातलेल्या मर्यादांचीही माहिती दिली. संभाजी होळकर यांनीही ग्रामस्थांच्या पूल उंच झाल्याच्या भूमिकेस सहमती दर्शवत अधिकाऱ्यांनी तोडगा सुचवावा असे परखड मत व्यक्त केले. अधिकाऱ्यांनी, पुलाच्या दोन्ही बाजूला रिटेनिंग वॉल (भींत) बांधून उतार शास्त्रीय पध्दतीने भरून देऊ. तसेच या रस्त्याला मिळणाऱ्या गाडवाटांचाही उतार काढू असा शब्द दिला. मात्र महेश शेंडकर, शिवाजी शेंडकर यांनी, " पुढील दोन पिढ्या पूल वापरायचा आहे. त्यामुळे केवळ स्लोप काढून देऊन प्रश्न मिटणार नाही. मुळातच डिझाईनमध्ये बदल करून पुलाची उंची एक मीटरने कमी करा आणि मग स्लोप काढून द्या. अन्य़था आम्हाला पूलच नको." अशी परखड भूमिका घेतली. यावर होळकर यांनी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पुलाच्या ठिकाणी पाचारण करू. चर्चेतून खात्रीशीर तोडगा काढू असे आश्वासन दिले. तोपर्यंत काम बंद ठेवावे अशा सूचनाही कंत्राटदारास देण्यात आल्या.
---