दौंड ! राष्ट्रीय सेवा योजना शिबिर विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यासपीठ : रामचंद्र नातू ! टाकळी भीमा येथे राहू येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 संदिप नवले : प्रतिनिधी.
टाकळी भीमा (ता.दौंड) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संलग्नित राहू येथील कैलास शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन सरपंच निखिल ठाकर यांच्या हस्ते करण्यात आले.
          याप्रसंगी बोलताना सरपंच निखिल ठाकर म्हणाले की,आमच्या वेळेस असे राष्ट्रीय सेवा योजनेसारखी शिबीर नव्हती पण तुम्ही विद्यार्थ्यांनी सात दिवस इथे राहून आपल्या कलागुणांना वाव द्यावा व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवावा.
              आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र नातू यांनी युवकांसमोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की,राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे.स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील माणसाचे जीवन समजून घेतले पाहिजे.खेडोपाड्यातील राहणाऱ्या गोरगरीब माणसासाठी आपण काम केले पाहिजे.या शिबिरामधून आपल्यामध्ये नक्कीच अशी भावना निर्माण होईल व पुढे आयुष्यामध्ये आपण राष्ट्रासाठी काही एक काम कराल व देशासाठी एक चांगली युवा नेतृत्व या शिबिरामधून निर्माण होतील.
      यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य गोपीनाथ बोत्रे,माजी सरपंच काशिनाथ गरदरे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमासाठी मोहिनी नवले,प्रीतम कुंभार,सुभाष ठाकर,संदीप पांगारकर,सहशिक्षक ज्ञानेश्वरी पिलाने,सचिन पिलाने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.मोहन शेलार कार्यक्रम अधिकारी यांनी केले.सुत्रसंचालन सा.प्रा.शुभांगी बारवकर यांनी तर आभार डॉ.प्रा.विकास टकले यांनी मानले.
............................................................
To Top