सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ऊस तोड कामगार हा कारखान्यातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. गेले अनेक पिढ्या त्यांची स्थलांतरामुळे प्रगती होऊ शकली नाही, शिक्षण मिळू शकले नाही. सरकारने याकामी पुढाकार तर घ्यावाच पण सामाजिक संस्थांनीही यासाठी योगदान द्यावे आणि शिक्षणाची चळवळ पुढे न्यावी अशी अपेक्षा ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप यांनी व्यक्त केले.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना स्थळावर कारखान्याच्याच वतीने 'कोपीवरची शाळा' हा प्रकल्प चालतो. प्रकल्पांतर्गत सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत शालेय मुलांचे अभ्यासवर्ग घेतले जातात. सोमेश्वर कारखान्यांच्याच साखर कामगारांनी सदर प्रकल्पास भेट देऊन दोनशे मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप केले. अध्यक्षस्थानी तुकाराम जगताप होते. याप्रसंगी बारामती तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष सुरेश होळकर, चिटणीस संग्राम चव्हाण, शिवाजी वायाळ, सुनील मदने, अशोक जगताप, भाऊसाहेब जगदाळे, सुनील क्षीरसागर, धनंजय जमदाडे, आनंद मदने, अरविंद जगताप, दिलीप सूर्यवंशी उपस्थित होते. यानिमित्ताने प्रतिक्षा गाडे, वैष्णवी सपकाळ या ऊस तोड मजुरांच्या मुलींची भाषणे झाली. अश्विनी लोखंडे, आरती गवळी, अनिता ओव्हाळ, संतोष होनमाने, संभाजी खोमणे यांच्या संयोजनामुळे खेळ, गाणी असा सांस्कृतिक कार्यक्रम असलेला 'बालमंच' संपन्न झाला.
नौशाद बागवान यांनी प्रस्ताविक केले. रमेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर अभय चव्हाण यांनी आभार मानले.-----