सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
खासदार रणजीतसिंह यांच्या प्रयत्नांना यश चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने फलटण पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये निधीची तरतूद केली व मंजुरी दिली त्याच पार्श्वभूमीवर आज खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थराज्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण बारामती जे रेल्वेचे काम सुरू आहे त्यासाठी रेल्वे लाईन टाकण्यासाठी 100 कोटी व फलटण पंढरपूर साठी २० कोटी तरतूद बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी केली त्याची दखल घेऊन आज वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली.
तसेच फलटण बारामती रेल्वे आपणाला धावताना दिसेल तसेच केंद्र सरकारने फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करण्याबाबत सुरुवातीची तरतूद म्हणून वीस कोटी रुपये मंजूर केले यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना सूचित केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच फलटण पंढरपूर साठी लागणारा संपूर्ण निधी देण्याबाबतचे आदेश दिले आहेत जेणेकरून फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू होऊन देशातील व महाराष्ट्रातील तमाम वारकरी व जनतेसाठी ही सेवा सुरू राहणार आहे त्यामुळे फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न होते.ते आपल्याला काहीच दिवसात पूर्ण झालेले दिसेल
तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेपेक्षा जास्त कामे या मतदारसंघात होताना दिसत आहेत. यासाठी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले आहेत याबाबत माढा लोकसभा मतदारसंघातील जनता खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे आभारी राहणार आहे यामुळे फलटण पंढरपूर फलटण बारामती फलटण लोणंद लवकरच औद्योगिकीकरणाच स्वप्नही आपल्याला पूर्ण झालेले दिसेल तसेच खूप मोठी आर्थिक चालना या भागाला मिळणार आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातल्या पाणी व रेल्वेचे जे प्रश्न आहेत ते प्रत्यक्षात आता मार्गे लागलेल्या आपणास दिसत आहे यामुळे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा भाजपा केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा वित्तमंत्र निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचे आभार मानले आहेत