सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर चे आमदार संजय जगताप यांच्या सामाजिक विकास फंडातून आज गुळूंचे (पुरंदर) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक सभागृहाचे उद्घाटन सो.कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
आ.संजय जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी गुळुंचे ग्रामपंचायत दशक्रिया घट सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले.
यावेळी पुरंदर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण, सुनीता कोलते, कैलास धीवर, संदीप धायगुडे, कांचन निगडे' राजेंद्र बरकडे, संभाजी कोलते, गणेश जगताप,अनिल कांबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन निगडे यांनी केले. तर निलेश नेवसे यांनी आभार मानले.