सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
अष्टविनायक मार्गावर सुपे कडून मोरगारकडे निघालेल्या मारूती ओमणी कारमध्ये अचानक गॅसचा टाकीचा स्फोट झाल्याने पेट घेतला आहे ,
स्थानिक वडगाव निंबाळकर (सुपे) पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुपे मोरगाव मार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील पासिंग असलेली ओमणी गाडी निघाली होती, यावेळी अचानक यामधील गॅसचा टाकीचा स्फोट झाल्याने गाडीने पेट घेतला , पोलिस पंचनामा नुसार गाडी पेटलेल्या ठिकाणी गाडीतील पॅसेजर गाडी सोडून फरार झाल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सलिम शेख यांनी दिली ,