पुरंदर ! दुकानाच्या जागेच्या वादावरून नीरा येथे माजी उपसरपंचास मारहाण : डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
नीरा (ता.पुरंदर) येथील माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरेचे माजी उपसरपंच कुमार (बाळू) मोरे यांनी या बाबतची फिर्याद दिली आहे. तर मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्या पायाला मार लागला आहे. 

    माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी जेजुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मोरे यांनी जनरल स्टोअरचे दुकान चालवण्यासाठी शकुंतला जगताप यांच्याकडून वार्ड नंबर २ मधील सिटी सर्वे नंबर ४३२ व ४३३ मध्ये एक गुंठे जागा भाड्याने घेतली होती. या ठिकाणी त्यांनी दुकानासाठी १० x १० ची टपरी टाकली होती. मात्र ही टपरी नितीन कांतीलाल बोरा यांच्या दुकानाच्या पुढील बाजूचे असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. गुरवार दि. ९ मार्च २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजलेच्या सुमारास मोरे हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी गेले असता नितीन कांतीलाल बोरा यांनी मोरे यांना शिवीगाळ केली. त्याच बरोबर हातात गज घेऊन मोरे यांना मारहाण केली. त्याचवेळी बोरा यांचा भाऊ  डॉ. दिलीप बोरा हा देखील हातात काठी घेऊन आला. त्याने सुद्धा मोरे यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. यानंतर मीना दिलीप बोरा यादेखील तेथे आल्या. त्यांनी मोरे यांना  शिवीगाळ केली. अशा प्रकारची फिर्याद मोरे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे. 

       हा प्रकार नीरेच्या लक्ष्मी रोडवरील भर पेठेत सुरू होता. त्यामुळे त्या ठिकाणी बघांयची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचे अनेकांनी व्हिडिओ चित्रणही केले. यानंतर शुक्रवार दि. १० मार्च २०२३ रोजी रात्री उशिरा याबाबतची फिर्याद जेजुरी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.
To Top