सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि २२ रोजी सायंकाळी ८ वाजता क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि २३ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे.
न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रीज सोन्याची नथ व पैठणी, दुसऱ्या क्रमांकासाठी एलएडी टीव्ही सोन्याची नथ व पैठणी, तिसऱ्या क्रमांकासाठी कुकर सोन्याची नथ व पैठणी चौथ्या क्रमांकासाठी ओहन सोन्याची नथ व पैठणी तर चौथ्या क्रमांकासाठी मिक्सर सोन्याची नथ व पैठणी अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.