जावली ! ओंकार साखरे ! उद्या मेढा येथे अजितदादांची तोफ धडाडणार : भव्य शेतकरी मेळाव्यात अमित कदम यांची घरवापसी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
मेढा - सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. सातारा जावली विधान सभेच्या पार्श्वभूमिवर विरोधकांच्या टिकेला शेतकरी मेळाव्यातुन उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षनेते आ. अजित दादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमित कदम काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून जावली महाबळेश्वर बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काय भुमिका घेणार कि भाजपशी समजोता करणार याचे चित्र स्पष्ट दिसणार आहे.
          जावली महाबळेश्वर बाजार समितीचे निवडणूकीचे बिगुल वाजले असताना या पार्श्वभुमीवर होत असलेला शेतकरी मेळावा राष्ट्रवादी पक्षाची ताकद दाखविणारा ठरणारा आहे. यानिमित्ताने मेढा येथे आज माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते आ. आजितदादा पवार यांच्या सह माजी विधान परिषद अध्यक्ष ना. रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, माजी जलसंपदा मंत्री व आ. शशिकांत शिंदे, मा. सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, माजी आ. दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने आणि माजी जि.प. सदस्य दिपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
          आज  मेढा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज दुपारी २ वाजता शेतकरी मेळावा आणि माजी अर्थ व शिक्षण सभापती अमितदादा कदम यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश असा भव्य कार्यक्रम होणार आहे. अमित कदम यांच्या प्रवेशाने जावलीमध्ये राष्ट्रवादी पक्षात नवचैतन्य निर्माण होणार असुन भाजपला रोखण्यात अमित दादा यशस्वी होतील अशी जोरदार चर्चा  सुरु झाली आहे. 
             या मेळाव्यातुन राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जावली करांना विरोधी पक्षनेते आ. अजित दादा पवार , विधान परिषद माजी अध्यक्ष आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शाशिकांत शिंदे आदी मान्यवर कार्यकत्यांना काय उर्जा देणार, आ. मकरंद पाटील जावली महाबळेश्वर बाजार समितीबाबत काय भूमिका घेणार, ५४ गावच्या पाणी प्रश्नासाठी बोंडारवाडी धरणाबाबत काय बोलणार , भुविकास बॅकेची कर्जे कोणी माफ केली या सर्वांची उकल शेतकरी मेळाव्यातून मिळणार काय याकडे जावली करांचे लक्ष लागुन राहीले आहे.
           उद्या मेढा येथे दुपारी २ वा. येथिल लक्ष्मी रोडवर मेळावा होत असलेल्या शेतकरी मेळाव्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कडून करण्यात आले आहे.


To Top