सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सिद्धटेक : प्रतिनिधी
अष्टविनायकातील ‘सिद्धटेक’ येथे गेले चार दिवस विद्युत पुरवठा खंडित आहे. मात्र: याबाबत वितरण कंपनी चे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. दर्शनासाठी येणारे असंख्य भाविक व स्थानिक नागरिकांना या गंभीर समस्येचा सामना करावा लागतो. राष्ट्रवादी आणि भाजप असे दोन आमदार असलेल्या कर्जत - जामखेड मतदारसंघात ही अवस्था केविलवाणी आहे.*
राज्यासह देशभरातून हजारो भाविक भक्त पर्यटक सिद्धटेक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दररोज येतात. या पर्यटकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याकडे मात्र प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. गावठाण हद्दीत असलेल एक विद्युत रोहित्र दि.११ मंगळवारी २०२३ पासून नादुरुस्त झाले. तेव्हापासून दोन-तीन तास वगळता अखंड वीज पुरवठा खंडित आहे. याचा गावातील भाविक व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.
अहमदनगर जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात अष्टविनायकातील हे स्थान आहे. येथील विद्यमान आमदार रोहित पवार व यानंतर माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना आमदार म्हणून विकासासाठी संधी मिळाली आहे. वास्तविक जनकल्याणासाठी याचा उपयोग होण्याऐवजी आपसात विकास कामे आडवा- आडवी करण्यावर या लोकप्रतिनिधींचा भर आहे.
तालुक्यात कार्यरत असणाऱ्या प्रशासन अधिकाऱ्यांनाही लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला नाही. येथील सर्व वस्तुस्थिती माहीत आहे. परंतु दोघातील अंतर्गत वादांमुळे जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली जाते. सिद्धटेक येथील राष्ट्रीयकृत सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा ही कारभार यामुळे ठप्प आहे. यामुळे आर्थिक देवाण-घेवाण बंद आहे.
COMMENTS