जावली ! ओंकार साखरे ! बंद असलेल्या बाजार समितीवर वर्चस्वासाठी एवढा अट्टाहास का ? जावली-महाबळेश्वर बाजार समिती बिनविरोध की निवडणूक, आज फैसला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
जावली महाबळेश्वर बाजार समितीच्या पंचवार्षीक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्या नंतर अनेकांनी दंड थोपाटत उमेदवारी अर्ज दाखल केले. १८ जागेसाठी ९७ अर्ज शिल्लक असून निवडूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचा दि. २० रोजी फैसला लागणार आहे. परंतु व्यवहार बंद असलेल्या बाजार समितीवर वर्चस्वासाठी सर्वांचाच अट्टाहास का ? असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो आहे.
            सन २००२ मध्ये स्थापन झालेल्या बाजार समितीवर सन २००७ पासून संचालक मंडळाची सत्ता स्थापन झाली. सुरवाती पासुनच राष्ट्रवादी पक्षाची निर्विवाद सत्ता या बाजार समितीवर पहावयास मिळाली . सन २००७ ते २०१४ आणि २०१५ ते २०२२ पर्यत राष्ट्रवादीचे वर्चस्व बाजार समितीवर समजले जात आहे.
            जावली महाबळेश्वर बाजार समितीमध्ये राजकीय दृष्ट्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे आणि आ. मकरंद पाटील यांचेच वर्चस्व आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार असून आ. शशिकांत शिंदे व आ. मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. 
              सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असताना वाई मध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने महाबळेश्वर हा राष्ट्रवादीचा ताकद असलेला तालुका आहे तर जावली तालुक्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार असून विकास कामांच्या जोरावर त्यांचीही ताकद आहे. तसेच आ. शाशिकांत शिंदे यांचीही ताकद जावलीमध्ये आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये दोन राष्ट्रवादीचे आमदार व एक भाजपचे आमदार समजोता करून बाजार समिती बिनविरोध करणार कि राष्ट्रवादी निवडणूकीला सामोरे जावून हॅट्रीक साधणार याचा निर्णय आज शेवटच्या दिवशी माघार घेण्याच्या प्रक्रियेनंतर दिसुन येणार आहे.
              बाजार समितीची सध्याची स्थिती बिकट असल्याचे बोलले जात असले तरी बाजार समितीच्या ताब्यातील ३९ गाळ्यांचे भाडे व भुखंडाचे भाडे जमा होता २० लाखाच्या वर आर्थिक उलाढाल होत असल्याचे समजते. बाजार समितीच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न केला गेला पाहिजे होता परंतु तसा प्रयत्न दिसुन आलेला नाही. बाजार समितीकडून वार्षीक बैल बाजार सुद्धा बंद झाल्याने आणि शेतीच्या मालाची देवाघ घेवान होत नसल्याने बाजार समिती हे निव्वळ राजकिय व्यासपीठ म्हणून चर्चेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
                जावली महाबळेश्वर बाजार समिती साठी आतापर्यत १०१ अर्जांपैकी फक्त चारच अर्ज माघार झाले असुन ९७ अर्ज शिल्लक राहीले आहेत. सध्या बाजार समितीच्या निवडणूकी वरुन वातावरण ढवळून निघाले असून बैठकांवर बैठका घेणारे आमदार बाजार समिती बिनविरोध करण्यावर किती यशस्वी ठरणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
To Top