मेढा ! जावलीत खरीप हंमाग अडचणीत...! खरीप हंगाम आढावा बैठक झालीच नाही : दुबार पेरणीसाठी शासनाने मोफत भात बीयाणे उपलब्ध करावे : अमित कदम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या जावली तालुक्यात   जुन महिना संपत आला तरी पावसाने हजेरी न लावल्या मुळे खरीप हंगाम लांबला असून भात पिकाचे क्षेत्रा बरोबरच एकंदरीत खरीप अडचणीत आला  आहे . शेतकऱ्यांनी पारंपारीक पद्धतीने धुळवाफेवर पेरलेले भात रोपांचे तरवे वाया गेले असून शासनाने दुबार पेरणीसाठी अशा शेतकऱ्यांना मोफत भात बीयाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती व जावलीचे राष्ट्रवादीचे नेते अमित कदम यांनी केली आहे. 
          अमितदादा कदम यांनी तालुका कृषि अधिकारी जावली संजय घोरपडे, शेतीअधिकारी पंचायत समिती जावली ( मेढा) श्रीमती येवले यांची भेट घेवून तालुक्यातील खरीप हंगामाचा आढावा घेतला. व यावेळी दुबार भात तरवे पेरणीसाठी शेतकऱ्यांना भात बियाणे मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी  संबधीत अधिकाऱ्यांकडे केली . यावेळी त्याच्या समवेत वे०णामाईचे चेअरमन  सुरेश पार्टे , मेढा विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश दळवी, प्रकाश कदम , व शेतकरी उपस्थित होते.
           खरतर १० ते १५ जुन या दरम्यान मानसुन पावसाचे आगमन जावली तालुक्यात होते . याच्या आधारावर शेतकरी धुळवाफेवर भात रोपांचे तरव्याची पेरणी करतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २०,३४७हे. असून त्यापैकी भात लागवडीचे क्षेत्र ८६००हे . एवढे आहे. भात पीक हेच तालुक्याचे  मुख्य पिक असून  पावसाने ओढ दिल्याने तेच पिक सध्या अडचणीत आले आहे. त्याचबरोबर विहीरी, तलाव, कुपनलिका यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने बागायती क्षेत्रातील पिकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे.  
 ---------------------     
     जावली तालुका खरीप हंगाम 
 भौगोलीक दृष्टया जावली तालुका तीन विभागात विखुरला आहे. बामणोली हा अती पर्जन्यमानाचा तर मेढा , केळघर, वेण्णा दक्षिण विभाग, करहर या विभागात मध्यम तर आनेवाडी , सायगांव या विभागात तालुक्याच्या मानाने पावसाचे प्रमाण अल्प असते. १० ते १५ जुन या दरम्यान पावसाचे आगमन होत असल्याने बामणोली, केळघर, वे०णादक्षिण ( मेढा) ,करहर ,या विभागात पारंपारीक पद्धतीनुसार " धुळवाफेवरच " भात रोपांचे तरवे पेरले जातात. या विभागातील मुख्य पिक भात आहे. तर कुडाळ , सायगांव, आनेवाडी, या विभागात कॅनॉलचे पाणी असल्याने बऱ्यापैकी शेती ओलिताखाली असल्याने बागायती पिके घेतली जातात. महु- हातगेघर धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले तर अधिकचे क्षेत्र बागायती होईल. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रश्न लवकर मार्गी लागला तर केळघर , मेढा परिसरातील ५४ गांवांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच , शेतीच्या पाण्याचाही प्रश्न कायमचा मिटणार आहे . त्यासाठी या प्रकल्पाला गती येण्याची गरज आहे.
  ------------ 
 खरीप हंगाम आढावा बैठक झालीच नाही.
        
खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी  जिल्हा पातळीवरूनच खरीप हंगाम आढावा बैठकांचे आयोजन तालुका पातळी वरुन केले जाते . ह्या बैठका १५ मे नंतर व्हायच्या . या बैठका मधून शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे यशस्वी ते साठी सविस्तर मार्गदर्शन केले जायचे.मात्र जिल्हा परिषदेसह  पंचायत समितीमध्ये गेले वर्षभर प्रशासक राज मुळे अधिकारी वर्ग ही उदासीन असल्याने    मोठा गाजावाजा करत होणारी या वर्षीची खरीप हंगाम आढावा बैठक झालीचं नाही. त्यामुळे पेरणीपूर्वी मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळालेच नाही.  खुर्चीत लोक प्रतिनिधी नसल्याने , व अधिकारी वर्ग ऐकत नसल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांने आपल्या व्यथा कोणाकडे मांडायच्या  हा एक गंभीर प्रश्न येथील शेतकरी , व नागरीकांचेमध्ये निर्माण झाला आहे. 
      जावली तालुक्याचे भौगोलीक क्षेत्र ५०, १५४ हेक्टर आहे. तालुक्याची लोकसंख्या १, २४, ६०० एवढी असून १५१ गांवे, १२६ ग्रामपंचायती आहेत .११४०७ हे. जंगला खालील क्षेत्र आहे. १६५४ हे. पडीक क्षेत्र २४, ४२५ हे. पिकाखालील एकुण क्षेत्र आहे.. त्यापैकी १० हजार हे. बागायत , २२, ७००हे. जिरायत , ८६०० हे. सर्वाधिक क्षेत्र हे भात लागवडी खालील आहे . तर १९०० हे. नाचणी, १०० हे. मका , १०० हे. भुईमुग , १७७ हे . ईतर कडधान्य लागवडी खालील आहे. रब्बी हंगामासाठी ११०७४ हे. क्षेत्र वापरले जाते. तालुक्यात रासायनीक खते विक्रेते २९ तर , परवानाधारक बि बियाणे विक्रेते दुकाने ३२ आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकृत बि. बियाणे व खते विक्रेते यांच्या कडूनच बीयाणे खते विकत घ्यावीत व त्याची रितसर पावती घ्यावी. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये . व अधिक माहिती साठी तालुका कृषि कार्यालय तसेच शेती विभाग पंचायत समिती जावली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय घोरपडे यांनी केले आहे. दरम्यान धुळवाफेवर पेरणी केलेल्या व पावसाअभावी वाळून गेलेल्या भात पिकाचा अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा . अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी भात बीयाणे शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अमित कदम यांनी केली आहे.
    पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम लांबणीवर 
   बळीरा अडचणीत, 
   खते , बीयाने खरेदीसाठी दुकानात झाली गर्दी 
   धुळ वाफेवर पेरणी केलेले भात तरवे पुन्हा पेरणी करावे लागणार.

To Top