जागरण (गोंधळ आयुष्याचा) ! कल्याणी जगताप ! महाराष्ट्रातील लोककला जपणारी महाराष्ट्रातील पहिली मराठी वेब सिरीज

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : कल्याणी जगताप
𝚀𝚞𝚒𝚌𝚔 𝚙𝚛𝚒𝚖𝚎 24  मराठी या प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्माते प्रतिक कुमार एम शाह्  कार्यकारी निर्माता  मनोज विभुते या निर्मिती संस्थेतून महाराष्ट्रातील  लोककला  जपली जावी .साता समुद्रापलीकडे लोक कला जाऊन पोहचली आहे you tube च्या माध्यमातून घराघरात पोहचता यावी लोक कला पुढच्या पिढीला समजावी . लोक कला अशा अनेक आहेत त्यातीलच एक जागरण ही एक आहे  वाघ्या मुरळी म्हणजे काय ?देवाला का सोडले जाते मुरळी च लग्न होत का ? त्याचा कार्यक्रम नेमका कसा असतो आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्न चे उत्तर या जागरण वेब सिरीज मध्ये पहा वयास मिळणार आहे .. असे वेबसिरीज चे दिग्दर्शक किरण गाजरे यांनी बोलताना सांगितले 
             quick prime 24  मराठी  या अगोदर धनगर समाज्यावर  आधारित धनगरवाडा ही वेब सिरीज 25 भाग  केले आहेत याचंही सुटींग बारामती फलटण भागात झाले होते.याही सिरीज ला  भरभरून प्रतिसाद दिला ..आता आपल्याला जागरण ही वेब सिरीज 1 जुलै  पासून दर शनिवारी सकाळी 09 वाजता पहावयास मिळेल .
जागरण वेब सिरीज चे दिग्दर्शक व  कॅमेरा एडिटिंग किरण गाजरे यांनी केले आहे. कथा - विकास जाधव यांची आहे 
प्रोडक्शन  हेड  जगन खांडेकर .लाईट स्टोरी रोहित वाव्हाळ  पोस्टर रत्नदीप बडे क्रियेटिव्ह लाईट डिओपी जयदीप पारधे  असून कलाकार सानिका तोरसकर कोमल परब साक्षी बोंगाने गीतांजली अनपट स्वप्नील कुचेकर प्रतिक लकडे  स्वप्नील राऊत मनोज मुळीक  वैभव भोसले जगन खांडेकर बाळू गायकवाड मॉन्टी चव्हाण जयदिप पारधे विश्वजीत  काकडे  बालकलाकार मनस्वी गावडे तसेच सरपंच टाकळवाडा शोभा जाधव मल्हारी जाधव आणि सचिन खांडेकर  किरण पवार यांचं सहकार्य लाभले असे बोलताना दिग्दर्शक किरण गाजरे यांनी सांगितले. यात ग्रामीण भागातील कलाकरांना संधी दिली गेलेली आहे.
To Top