सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
वेण्णा नदीमध्ये शासनाच्या आदेशाला कोलदांडा लावत काही लोक नदीतील गाळ घेवुन जात असताना मुरुम आणि दगडावर सुध्दा डल्ला मारत आहेत. याबाबत प्रशासन मुग मिळुन गांधारीची भुमीका पार पाडत असल्याने जनतेतुन तसेच वाहनातुन खुली वाहतुक होत असल्याने वाहन धारका मधुन वाहन चालविकास त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
वेण्णा नदी पात्रातील गाळ काढला जावा त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होईल यासाठी मे अखेर पर्यत रॉयल्टी काढून गाळ नेण्याची परवानगी प्रशासनाकडून दिली जाते . दि. ३१ मे ही रॉयल्टी परवानगीची अखेरची तारीख तहसिलदारांच्या कडून मिळलेली असताना सुद्धा माती गाळ, मुरुम आदी वाहन धारकांकडून सुरूच असून प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
वेण्णा नदी पात्रातुन नेमके काय आणि किती प्रमाणात व किती वाहलातुन नेले जात आहे याचा तपास न होता वाहन धारक ओव्हर लोढ करून वाहनातुन वाहतुक करीत आहे तसेच वाहतुक करीत असताना मातीवर झाकण नसल्याने मातीची धूळ पाठीमागील वाहन धारकांना त्रास देत आहे या कडे प्रशासनाची डोळेझाक होत असताना दिसत आहे.
प्रशासनाच्या या गांधारीच्या भुमिकेमुळे नदी पत्रातील कोणी कुठेही माती उत्खनन केल्यामुळे भविष्यात त्या खोदलेल्या खड्यांमळे जिवीत हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदी पात्रामध्ये जनावरे पाणी पिण्यासाठी जात असतात तर मुले पोहण्यासाठी जात असल्याने नदी पात्रा ऐवजी अजुबाजुने कुठेही खड्डे घेतल्याने दुर्दैवी घटना घडू शकते असे नागरीकांचे म्हणणे असून प्रशासन यावर गप्प का? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.