पुरंदर ! नीरा डावा कालवा अस्तरीकरण विरोधात नऊ गावातील शेतकरी उतरणार रस्त्यावर : क्रांतिदिनी नीरा येथे रस्ता रोको

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
नीरा : विजय लकडे 
नीरा डाव्या कालव्याच्या पुरंदर तालुक्यात चालू असलेल्या अस्तरीकरण विरोधात तालुक्यातील नऊ गावे एकवटली असून नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज चौक नीरा या ठिकाणी सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन होणार आहे. 
           नीरा  डाव्या कालव्याच्या अस्तरीकरण विरोधात तालुक्यातील नऊ गावातील शेतकरी आक्रमक झाला असून निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण त्वरित रद्द करण्यात यावे अस्तरीकरणाचे चालू असलेले बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे ही मागणी तालुक्यातील निरा शिव तक्रार  मांडकी जेऊर पिंपरी खुर्द थोपटेवाडी राख  गुळूंचे कर्नल वाडी या गावातील शेतकऱ्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री पालकमंत्री. व  पाटबंधारे विभाग यांना लेखी नऊ गावातील शेतकऱ्यांच्या सहीनिशी पत्राद्वारे केली आहे. 
        मागणीची दखल न घेतल्यास नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी रस्ता रोको आंदोलन करून या विरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या नऊ गावातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी दिला आहे
To Top