बारामती ! सोमेश्वरनगर-करंजेपुल येथे कारगिल विजय साजरा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कारगिल विजय दिवस सोमेश्वरनगर-करंजेपुल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली देऊन व रॅली काढून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
        यावेळी बारामती तालुक्यातील सैनिकांनी उपस्थिती दर्शवली.कोर्हाळे बुद्रुक वरून उपाध्यक्ष माळशिकारे तसेच सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित राहिले. चौधरवाडी, माळवाडी, वाकी, मोरगाव, सोमेश्वर पंच क्रोशीतील सर्वच आजी माजी सैनिक उपस्थित राहिले. सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर तसेच उपाध्यक्ष माळशिकारे, कार्याध्यक्ष नितीन शेंडकर कायदेशीर सल्लागार गणेश आळंदीकर सर यांनी देखील उपस्थिती दर्शवली. करंजे पूल, सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज, काकडे कॉलेज, वाघळवाडी आश्रम शाळा, काकडे महाविद्यालय, सोमेश्वर कारखाना शिवछत्रपतीला हार घालून रॅलीचे पुन्हा आगमन करंजेपूल येथे झाले. यावेळी उपस्थित मान्यवर माजी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब गायकवाड, सरपंच वैभव गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रूपचंद शेंडकर, संचालक ऋषिकेश गायकवाड, सिद्धीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव सोरटे या सर्वांच्या उपस्थित शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.    प्रस्तावना सल्लागार ॲङ गणेश आळंदीकर यांनी केले. 
          कारगिल विजय लढाईमध्ये सहभाग घेतलेले श्री रासकर यांचे भाषण झाले. माळशिकारे यांचे देखील भाषण झाले. आभार सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंङकर यांनी मानले. आपल्या परिसरातील गुणवंत जवानांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक तुकाराम सोरटे तसेच शंभूराजे सोरटे यांचा देखील सत्कार करण्यात आला रॅलीमध्ये सहभागी सर्व जवानांना वृक्षारोपणासाठी फळझाडांची वाटप करण्यात आली. 

To Top