सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
नीरा बारामती रस्त्यावर निंबुत (लक्ष्मीनगर) येथे दोन दुचाक्या समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरून तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये मुरूम येथील पती पत्नीचा समावेश आहे.
गोपाळ दत्तात्रय कुंभार व नंदा गोपाळ कुंभार रा. मुरूम-सळोबालिफ्ट तसेच निंबुत छपरी येथील आप्पा अरविंद बामणे अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी साई सेवा हॉस्पिटल सोमेश्वरनगर येथे दाखल केले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.