जावली ! स्वातंत्र्यसैनिक स्व.लक्ष्मण फरांदे यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी : प्रांताधिकारी दादासाहेब दराडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे)
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र सैनिकांनी देशाच्या स्वातंत्रासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व स्वातंत्र सैनिक अथवा त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार शासनाच्या  वतीने करण्यात येत असून त्यापैकीच सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील आनेवाडी गावाचे सुपुत्र व स्वातंत्र सैनिक स्व लक्ष्मण फरांदे यांचे पत्नी श्रीमती कुसुमताई फरांदे यांचा सन्मान जावलीचे प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांचे हस्ते करण्यात आला
           याप्रसंगी बोलताना प्रांताधिकारी दादासाहेब दराडे म्हणाले देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी मोठे कष्ट घेतले तसेच आपल्या जीवाची व कुटुंबाची देखील पर्वा केली नाही अश्या स्वातंत्र्य सेनानी यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे भाग्यचे आहे, या सत्कार वेळी जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबिया प्रति आदर व्यक्त करीत असताना म्हणाले, स्व. लक्ष्मण फरांदे यांचे कार्य कायम स्मरणात राहणार असून त्यांचा व त्यांच्या कुटुंबीय यांचा त्याग व्यर्थ जाणार नाही त्यांच्या मुळेच खरेतर आपण देशात मुक्तपणे वावरत आहे
           स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जोडीदार यांचे वय विचारात घेता त्यांना कमीत कमी त्रास होईल याकरीता जावलीचे प्रांताधिकारी दादासाहेब दराडे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी स्वातंत्र्य सैनिक यांचे पत्नी श्रीमती कुसुमताई फरांदे यांचा आनेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन  मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून यांचा सत्कार करणेत आला, यावेळी तहसीलदार कार्यालयातील अधिकारी श्रीमती हर्षदा फाळके अव्वल कारकून, पंकज शिंदे, सुप्रिया फरांदे, मंडल अधिकारी डी. एन. शिंदे, तलाठी अनिल कांबळे, संतोष फरांदे सुधीर फरांदे इ. उपस्थित होते.
To Top