सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
ग्रामीण भागाचा अर्थकारण हे दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. हा व्यवसाय पवित्र व्यवसाय असून कोणतीही भेसळ न करता हा व्यवसाय केला तर शेतकऱ्याची प्रगती झाल्या शिवाय राहत नाही. अगदी थोड्या भांडवला वरती देखील हा व्यवसाय करता येतो. असे मत मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
नीरा (ता पुरंदर ) येथे अमुल खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संचलित. श्री स्वामी समर्थ दूध उत्पादक संघ मंडळ निरा शिव तक्रार या नावाने चालू केलेल्या दूध संकलन व शीत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विजय शिवतारे नीरा येथे बोलत होते. यावेळी
पुणे जिल्हा महिला आघाडी च्या नेत्या ममता शिवतारे-लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
गणेश गरदडे या युवकाने चालू केलेल्या या नवीन व्यवसायास शुभेच्छा देण्यासाठी पुरंदर शिवसेना ता प्रमुख दिलीप यादव, राष्ट्रवादी सरचिटणीस महेश देवकाते, अमुल दूध संकलन विभाग प्रमुख सचिन हळकुंडे, पशु वैद्यकीय अधिकारी हनुमंत पाटील, पंकज धिवार, गीतांजली ढोणे, उमेश गायकवाड, समीर जाधव, वसंत दगडे, माजी सभापती पुरंदर सुजाता दगडे, सोमेश्वर संचालक लक्ष्मण गोफणे, नीरा ग्रा सदस्य संदीप धायगुडे, श्रमवीर पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र काकडे, कांचन निगडे, शिवसेनेचे दयानंद चव्हाण,सुदाम बंडगर केशव बंडगर, विजय शिंदे भगवान गोफणे, यांच्यासह निरा व निरा व परिसरातील अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. चांगल्या प्रतीच्या दुधाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही गणेश गरदडे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिली.
सूत्रसंचालन विराज मदने यांनी तर आभार गणेश गरदडे यांनी मानले.