पुरंदर ! नीरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निरा (ता पुरंदर ) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे सामाजिक युवा मंच च्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट पर्यंत पार पडला.    
         त्यानिमित्त प्रतिमा पूजन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व्याख्यानमाला. समाज रत्न पुरस्कार व भव्य मिरवणूक असे कार्यक्रम पार पडले. यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे माजी सभापती बांधकाम व आरोग्य दत्ता चव्हाण भाजपचे गंगाराम जगदाळे संदीप धायगुडे संजय निगडे बाळासाहेब भोसले उमेश चव्हाण दादा गायकवाड व सुनील पाटोळे उपस्थित होते. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटोळे प्रताप भोसले सुरेश खुडे अवी भिसे गणेश पाटोळे अभि पाटोळे आकाश कुचेकर आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.  
         नीरेमधील लक्ष्मी रोडपासून (बुवासाहेब चौक ) छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. जेजुरी मार्तंड देवस्थानचे नवनियुक्त विश्वस्त अनिल सौंदडे यांना पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच प्रा गोरख साठे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
To Top