बारामती ! नागाने दंश केलेल्या 'त्या' सर्पमित्राची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली : आजपर्यंत दिले होते शेकडो सर्पांना जीवदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
लोणी भाकर ता. बारामती येथील विजय छबुराव यादव या सर्पमित्रास दिनांक 15 ऑगस्ट रोजी विषारी नागाने दंश  केला होता. शेकडो विषारी व बिनविषारी सर्पांस  जीवदान देणाऱ्या या सर्प  मित्राच अखेर आज  मृत्यू झाला.
        बारामती तालुक्यातील लोणी  भापकर येथील विजय छबुराव यादव हे गेल्या 30 वर्षापासून सर्प पकडण्याचे काम परिसरामध्ये करत होते. विनाशुल्क सर्प पकडण्याचे काम ते करत असल्याने शेतकऱ्यांचा ते एक जवळचा मित्र म्हणून त्यांची ओळख बारामती तालुक्यात सर्व दूर होती.  दिनांक 15 ऑगस्ट या  दिवशी त्यांचा  मित्र युवराज भापकर यांच्या  सुपा नजीक  खराडेवाडी  येथे घराजवळ  विषारी नाग निघाला असल्याची माहिती त्यांना समजली. नाग पकडण्यासाठी ते खराडवाडी येथे पोहोचले. गुरांसाठी बनवलेल्या मुरघासाचे खड्ड्यात हा विषारी नाग होता.

नाग  पकडत असताना त्यांना या विषारी नागाने त्यांना दंश  केला होता. नागाने दंश  करूनही विजय यांनी  त्या नागास मोकळे शेतामध्ये सोडून दिले होते. बारामती येथे अधिक उपचारासाठी जात असताना ती बेशुद्ध अवस्थेत होते तब्बल 24 तासांमध्ये नंतर त्यांचे प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. मात्र अखेर  आज  हजारो सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा मृत्यू झाला. समोरच्या कुठल्याही व्यक्तीला राम राम म्हणण्याची त्यांची पद्धत अनेकांनी अनुकरली होती. दिनांक 15 ऑगस्ट चा त्यांचा राम राम हा शेवटचा ठरला असल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
To Top