भोर ! नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले : नीरा नदीत ४२३० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के 
निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दि ८ रोजी दिवसभरात ५६ मी मी ते १०५ मी मी एवढी पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने निरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले आहे. 
       त्यामुळे धरणातून नदी पात्रामध्ये आज सकाळी ७:०० वाजता धरणाच्या सांडव्या वरून ३४८० क्यूसेक व विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक एकूण ४२३० क्यूसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे.  
पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली.
To Top