बारामती ! ४१० कोटींचा व्यवसाय : पुणे जिल्हा बँकेने राजहंस पतसंस्थेचा 'उत्कृष्ट सहकारी पतसंस्था' म्हणून केला गौरव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेकडून ' उत्कृष्ट सहकारी पतसंस्था' असा पुरस्कार प्राप्त झाला आहे.  
         गेली चौतीस वर्ष राजहंस पतसंस्था जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सतत अ वर्ग मिळवणारी आणि दरवर्षी समाधानकारक लाभांश देणारी नामांकित संस्था आहे. सद्यस्थितीत संस्थेचा 410 कोटींचा व्यवसाय असून 230 कोटींच्या ठेवी तर 180 कोटींचे कर्जवाटप आहे. संस्थेच्या आता नऊ शाखा असून मुख्य कार्यालय व तीन शाखाना स्वमालकीच्या इमारती आहेत. कारभार पूर्ण संगणकीकृत आहे. स्वभांडवल 19 कोटी 50 लाख तर, फंड 35 कोटी आहेत. रोख तरलता 1.21 %  वैधानिक तरलता 25.27 % आहे. महत्वाचे म्हणजे बँकेत गुंतवणूक 124 कोटींची आहे. 
To Top