सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हीर्डोस मावळ खोऱ्यातील निगुडघर गावच्या हद्दीत रायरीला जाणाऱ्या रोडच्या कडेला झाडाझुडपांच्या आडोशाला बसून तर ताराबाई चिकणे यांच्या घराच्या भिंतीच्या बाजूला लपून दारू विक्री करणाऱ्या दोघांवर भोर पोलिसांनी छापा टाकून ३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
देशी दारू विक्री करणारे दक्षेश राजेंद्र कंक वय- ३६(रा.म्हसर खुर्द) व सोमनाथ अंकुश मळेकर वय -४० (रा.करंजगाव) यांच्यावर भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कार्यवाही भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील तसेच उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.
COMMENTS