सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
गुजरात राज्यातील सुरत येथे होणाऱ्या एकदिवशीय साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी नऱ्हे ता.भोर येथील उदयोन्मुख क्रिकेटपटू सिद्धेश अशोक वीर याचेकडे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
२३ वर्षाखालील गटात महाराष्ट्र संघ सहभागी झाला आहे.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव शुभेंद्र भांडारकर यांनी महाराष्ट्राचा संघ जाहीर केला. यात सिद्धेश वीर (कर्णधार),यश बोरामणी,दिग्विजय जाधव,हर्षल काटे, अनिकेत नलावडे,अथर्व वनवे,रोहित फडके,अंश धूत,आदित्य लोंढे,साहिल सुरू, दीपक डांगे,सुरेश चव्हाण,रोशन वाघमारे,रामेश्वर दौड, निहाल तूसामद,रमेश गावडे यांचा संघात समावेश आहे.महाराष्ट्राचा इलिट ड गटात समावेश असून या गटात महाराष्ट्रासह पंजाब, केरळ,नागालँड,हिमाचल प्रदेश,कर्नाटक या संघांचा समावेश आहे.सिद्धेश वीरचे भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.