Wai News ! वाई एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीतील एका २४ वर्षीय कामगाराची आत्महत्या

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई एमआयडीसी येथे एस. डी. बी. कंपनीतील एका २४ वर्षीय तरुणाने कंपनीतच आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली. 
        गणेश रघुनाथ थोरवे, वय २४, रा. व्याहळी, ता. वाई असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने कंपनीतच आत्महत्या केल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून तो रात्रपाळीला कामावर होता. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान व्याहळी गावातील मित्रमंडळींसह नातेवाईक आणि ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नोंद पोलिसात झाली असून अद्याप आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
To Top